Advertisement
नागपूर: काही दिवसांपूर्वी हिंगणा रोडवर तरुणांनी बेशिस्तपणे कार चालवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर वाहतूक पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित पाच वाहनचालक तरुणांवर प्रत्येकी २३ हजार रुपयांपेक्षाही जास्त दंड ठोठावला.
या दंडाव्यतिरिक्त त्या तरुणांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत लेखी माफी मागण्यासही वाहतूक पोलिसांनी भाग पाडले.
सुधारात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांनी त्या बेशिस्त तरुणांसाठी ट्रॅफिक पार्क येथे ट्रॅफिक शाखेच्या रोड सेफ्टी पेट्रोल (RSP) शाखेने ट्रॅफिक नियमांवर दोन तासांचे सत्र देखील आयोजित केले होते.
दरम्यान डीसीपी ट्रॅफिक अर्चित चांडक यांनी रस्त्यांवरील बेशिस्त वाहन चालवणे आणि गुंडगिरीविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.