नागपूर – उपराजधानी नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, शनिवारीच्या तुलनेत रविवारी 0.7 अंशांची किंचित घट झाली आहे. मात्र उन्हाचा तीव्रपणा कायम असून नागरिक हैराण झाले आहेत.
विदर्भातील हवामान दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. एप्रिल महिन्यात सूर्याची तीव्रता वाढत चालली असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान 40 अंशांच्या वर स्थिर आहे.
रविवारी नागपूरमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दुसरीकडे चंद्रपूर जिल्हा 44.6 अंश सेल्सिअससह विदर्भातील सर्वात उष्ण ठरला.
इतर जिल्ह्यांचे तापमान खालीलप्रमाणे:
वर्धा – 44 अंश
अकोला – 44.3 अंश
बुलढाणा – 36.6 अंश
भंडारा – 41.4 अंश
गडचिरोली – 42.6 अंश
वाशिम – 42.6 अंश
यवतमाळ – 43.6 अंश
अमरावती – 44.4 अंश
हवामान विभागाने 19 व 20 एप्रिलसाठी लूची (गरम वाऱ्यांची) इशारा दिला असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान गरज नसताना घराबाहेर जाणे टाळा, भरपूर पाणी प्या आणि शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.