नागपूर : महाराष्ट्रातील नागपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात आता सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाईनंतर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या हिंसाचारातील आरोपी युसूफ शेखच्या घरावर बुलडोझर चालवला.
ही कारवाई अशा वेळी झाली आहे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते. यानंतर, नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) सोमवारी फहीम खान व युसुफ शेख या दोन आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली. तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सिल करण्यात आली.
नागपूर हिंसाचार प्रकरणात राज्य सरकारच्या बेधडक कारवाईला वेग प्राप्त झाला असून नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथक ही आता ॲक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र आहे. संजय बाग कॉलनीतील फहीम खानचे घर नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले आहे. त्यानंतर नागपूर हिंसाचारात आरोपी युसुफ शेख यांचे नागपूरच्या महाल भागातील जोहरीपूर येथे घर त्यावर पालिकेने हातोडा चालवला आहे.
युसूफ शेख घरात खाली पार्किंग मध्ये एक रुम अनधिकृत आहे सोबतच अधिकृत नकाशा व्यतिरिक्त पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बालकनीचे बांधकाम करण्यात आले होते, ते नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने तोडले आहे.गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या FIR मध्ये युसूफ शेख चे नाव हे 48 नंबर आहे तर फहीम खान मुख्य आरोपी पैकी एक आहे.