नागपूर: शहरातील महाल परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत.या दंगलीत सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे नागपूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांनी महत्ताचे पाऊल उचलले आहे. नागपूर शहरातील दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः उठवली. तर, काही भागात संचार बंदीत शिथिलता आणली आहे. तर, हिंसाचाराने होरपळलेल्या भागातील पोलीस स्टेशनअंतर्गत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
‘या’ भागातून हटविण्यात आली संचारबंदी – नंदनवन आणि कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठिकाणांवरील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात येत आहे. 18 मार्च रोजी रात्री सुरू झालेली संचारबंदी आज 20 तारखेच्या दुपारपासून म्हणजे आज दुपारी 2 वाजल्यापासून हटविण्यात आली आहे. संचारबंदी पूर्णपणे उठवल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
‘या’ परिसरातील संचारबंदी शिथिल –
शांतीनगर, पाचपावली, लकडगंज , सक्करदरा, इमामवाडा, या भागात लोकांच जनजीवन सुरळीत राहावे यासाठी आढावा घेऊन आज पासून दोन वाजता पासून सायंकाळी 6 पर्यंत चार तासाकरिता शिथीलता देण्यात आली आहे. पोलिसांकडून या भागातील संचार बंदीत 4 तासाची शिथिलता देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
हिंसाचार झालेल्या ‘या’ भागात संचारबंदी कायम-
कोतवाली, तहसील आणि गणेश पेठ या भागात हिंसाचार झाला होता. त्यामुळे या पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जशास तसा सुरू राहणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.