नागपूर: गेल्या सोमवारी रात्री शहरात झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मात्र तरीही पोलिस आणि प्रशासन खूप सतर्क झाले असून परिस्थिती सामान्य होत चालली आहे.
हे पाहता नागपूर पोलिसांनी गुरुवारी दुपारी २ नंतर अनेक भागातील कर्फ्यू उठवण्याचा निर्णय घेतला.
शहरातील नंदनवन आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागातून संचारबंदी उठवण्यात आली. त्याच वेळी, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, इमामवाडा पोलिस स्टेशन परिसरात संचारबंदी शिथिल करण्यात आली. या भागात, अत्यावश्यक कामांसाठी आणि आवश्यक वस्तू गोळा करण्यासाठी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत सूट देण्यात आली.
तर, नागपूरच्या कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व भागात पूर्वीप्रमाणेच कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ज्या ५ पोलिस ठाण्यांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली होती, तिथे आता पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
२४ तासांतच पोलिस आणि प्रशासनाने हा निर्णय बदलला आहे. आता, कोतवाली, तहसील, गणेशपे, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा, यशोधरानगर पोलिस क्षेत्रात कर्फ्यू लागू आहे.