नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे अतिशय साधं आणि शेतकऱ्यांप्रती आस्था असलेलं व्यक्तीमत्व असून महाराष्ट्राच्या सुपुत्राला मन:पूर्वक अभिवादन करूया, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी श्री.बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी श्री.पटोले बोलत होते.