Advertisement
नागपूर : लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानावर बुधवारी चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारचा निषेध केला आहे.
नागपुरात हिवाळी अधिववेशात त्याचे पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. विधीमंडळ परिसरात महाविकास आघाडीकडून शहांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करीत आहेत.
निळ्या टोप्या परिधान करुन विरोधकांनी शहांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडीच्या इतर नेत्यांनीही ‘जय भीम’ च्या घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला.