नागपूर : मित्रामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने तुषार सुधीर येवले नावाच्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ‘नागपूर टुडे’ च्या हाती मृतक तुषार याचे सुसाइड नोट लागले आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगी नगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषारने कॅफे सुरू करण्यासाठी 12 लाख रुपये मित्र गोपीला दिले होते. मात्र, गोपीने काही दिवसांमध्येच कॅफे बंद करून मुंबईला स्थलांतर केले. अचानक बंद पडल्याने आणि आर्थिक नुकसानीमुळे तुषारला प्रचंड ताण आला. याच तणावातून 21 ऑगस्ट रोजी तुषारने विष प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी तुषारने सुसाईड नोट टाकून त्याच्या मित्राला पैसे परत करण्याची आणि वडिलांना देण्याची विनंती केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.