नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात रवीवारी (ता. ९) हृषिकेश रानडे व त्यांच्या चमूने सादर केलेल्या हिंदी, मराठी गाण्यांवर नागपूरकर चांगलेच थिरकले. रविवारी महिला उद्योजिका मेळाव्याला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दी केली.
मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग, बचत गट, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध लाभार्थ्यांना योजनेतील लाभाचे धनादेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे सहायक आयुक्त श्री विकास रायबोले, जनसंपर्क अधिकारी श्री.मनीष सोनी, डॉ. मंजुषा मठपती आदी उपस्थित होते.
रविवारी हृषिकेश रानडे यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सुर निरागस या गाण्याने करण्यात आली. सुर निरागस या गण्यानंतर मन उधाण वाऱ्याचे. … आनंद घना….. क्या जानू सजन… तुम मिले दिल खिले…कधी तू…. नीले नीले अंबर पर चांद जब आये… तेरी दिवाणी…..ये श्याम मस्तानी…….. आओगे जब मोह मोह के धागे…..अभी मुझमे कही… एक हसीना थी…. माऊली माऊली…. अभी मुझमे कही… अधीर मन झाले… सारा जमाना…. गाता रहे मेरा दिल… एक मै एक तू….. आई भवानी…. मधुमन मे राधिका… कजरा मोहब्बत वाला… अरे दिवानो… जय शिवशंकर… अश्विनी ये ना….या गाण्याचे सादरीकरण हृषिकेश आणि स्वाती, सागर आणि निकिता यांनी केले.
महिला उद्योजिका मेळाव्यात रविवारी मनपाचे सहायक आयुक्त श्री. विजय थूल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आदी विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वृषाली देशपांडे यांनी केले व शेवटी आभारही मानले.
विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरित
दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयं रोजगारासाठी वैयक्तिक तथा सामूहिक बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी प्रति लाभार्थी ९५ हजार रुपये असे १०० दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत अनुदान देण्यात आले. यावेळी मंदाबाई मोहरकर, शालू तांडेकर आम्रपाली मोटघरे, जयश्री माथनकर, सायली अतकरे यांना मान्यवरांचे हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांगाना साहित्य खरेदी करण्यासाठी प्रती लाभार्थी ६० हजार रुपये प्रमाणे २९ दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना १७.४० लक्ष अनुदान डीबीटी अंतर्गत देण्यात आले. यावेळी आलीशा रिझवान, श्रुती गेडाम यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजेअंतर्गत घटक क्र ३, घटक ४ व रमाई आवास योजने अंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना किंवा दिव्यांग असल्यास त्यांना या योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त मनपा कडून ५० हजार प्रति लाभार्थी रक्कम अर्थसहाय्य देण्यात येते. यावेळी सुनीता बडवाईक, रेखा रेंडे यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. याचबरोबर साची महिला बचत गट (३ लक्ष), उन्नती महिला बचत गट (१० लक्ष), समृध्दी महिला बचत गट (५ लक्ष), गंगा महिला बचत गट (६ लक्ष), पारमिता (२ लक्ष) असे एकूण २६ लक्ष ९५ हजार रुपयांचे धनादेश बचत गट यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
महिलांची आरोग्य तपासणी
नागपूर महानगरपालिकातर्फे महिला उद्योजक मेळाव्याच्या पाचव्या दिवशी रवीवारी (ता.९) आरोग्य विभाग मार्फत स्वच्छता कर्मचारी तसेच इतर महिला करीता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी १२३ महिलांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर यशस्वी उद्योजक व उत्पादित वस्तू पॅकिंग व ब्रॅण्डिंग तसेच निवड करण्याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोह संस्थेच्या श्रीमती शर्मिष्ठा गांधी, मार्केटिंग तज्ज्ञ श्री. एस.एन.पठाण यांनी मार्गदर्शन केले. तर आरोग्य विभागाच्या डॉ. प्रीती राठी व डॉ. प्रीती चापेकर यांनी महिला मासिक पाळीत स्वच्छता बाबत घ्यावयाची काळजी तसेच स्तन कॅन्सर बाबत मार्गदर्शन केले.