मनपात शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चे आयोजन
नागपूर: शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी नागपूरकर पूर्णतः सज्ज झाले आहेत. आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी नागपूर महानगरपालिकेला सोबत सहकार्य करायला सुरुवात केली आहे. स्वच्छता संदर्भात मनपाच्या विविध उपक्रमांना नागरिकांची उत्तम साथ मिळत आहे. पूर्वी ज्या ठिकाणी लोक कचरा टाकत होते, तिथे आता स्वच्छता दिसून येत आहे. नागरिक घरातील कचरा- कुंडी मध्ये कचरा टाकत आहेत. उपराजधानीला सुदंर ठेवण्यासाठी माजी नगरसेवक, लोक प्रतिनिधी तसेच महा मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, बांधकाम विभाग, सी पी डब्ल्यू डी, नागपूर स्मार्ट सिटी, वेद फाउंडेशन, रोटरी क्लबसह स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संगठन पुढे येत आहेत.
नागपूर महानगरपालिकेतर्फे शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा -२०२२ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध झोन कार्यालयांसाठी बक्षीस मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी घोषित केले आहे. त्यानुसार स्पर्धेचे प्रथम पुरस्कार १०० लक्ष, द्वितीय पुरस्कार ५० लक्ष आणि तृतीय पुरस्कार २५ लक्ष दिला जाणार आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी सांगितले की, शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ हे मागील २ ऑक्टोबर पासून सुरू झाली असून येत्या ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. स्पर्धेसाठी लोकसहभागातून निधी गोळाकडून तो खर्च करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या परिसराला सुंदर आणि स्वच्छ राखण्यासाठी पुढे याव, असे आवाहन श्री. राम जोशी केले आहे. श्री. राम जोशी पुढे म्हणाले की, शहरातील मध्यवर्ती चौक, शिल्प, वास्तू, कारंजे, प्रमुख वारसा स्थळाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नागरिकांनी आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा.
सौंदर्यीकरणासाठी मनपाचा पुढाकार
स्वच्छता संदर्भात मनपाच्याद्वारे विविध उपक्रम रावबिल्या जात आहेत. परिणामी सदर येथील उपजिल्हाधिकारी वसाहत येथे नागरिक कचरा टाकत होते, रोटरी क्लबच्या माध्यमातून या परिसराला सुंदर करण्याचे काम करण्यात आले आहे. आता इथे कोणीही कचरा टाकत नाही आणि जर कोणी कचरा टाकला तर तिथले नागरिक त्याला विरोध करतात. शहरातील विविध अस्वच्छ परिसर नागरिकांच्या सहकार्यांनी सुंदर झाले आहेत. तसेच ऑरेंज सिटी रुग्णालयाचा मागील वस्ती मध्ये नागरिक एका ठिकाणी कचरा टाकत होते. मनपाच्या उपक्रमांमुळे आता तिथल्या रहिवास्यांनी आपला परिसर सुंदर करण्याचा निर्धार घेतला आहे. तेथे कचरा आता दिसेनासा झाला आहे. शहरातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्या स्वच्छ प्रसाधनगृहाची होती. रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान, हेल्प लिंक चेरिटेबल ट्रस्ट, नागपूर आणि ब्राम्होस ऐरोस्पेसच्या सहकार्याने महिलांसाठी प्रसाधन गृहाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांचा सहकार्याने नागपूर शहराला सुंदर आणि स्वच्छ करू शकतो, असेही श्री. राम जोशी म्हणाले.