कोरानामुळे विदर्भातील काही शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली. संचारबंदीमुळे सर्व व्यवहारच बंद असल्यामुळे शहरवासियांप्रमाणेच आदिवासी भागातील वनवासींनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. संचारबंदीमुळे आदिवासी भागात कोणत्याच सुविधा पोहाचू शकल्या नाहीत.
आवागमनही बंद असल्यामुळे आदिवासी भागाचा शहराशी संपर्कच तुटला. परिणामी त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यापासून वंचित राहावे लागले व कठीण परिस्थितीला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरवासियांपेक्षाही आदिवासी क्षेत्रातील लोकांची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशा स्थितीत त्यांनाही मदतीचा हात देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा लहानसा प्रयत्न सामाजिक जबाबदारी समजून व सामाजिक जाणिवेचे भान ठेवत आपणा सर्वांना करायचे आहे.
यासाठी आपल्या घरी सुस्थितीत असलेले जुने कपडे, जुने जोडे चप्पल, आपल्याला अनावश्यक असलेली भांडी, आदिवासींना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या मनाने मदत करावी. ही मदत एका बॉक्समध्ये ठेवून पाठवावी. या बॉक्सवर आपले नाव, आत असलेल्या वस्तूंची यादी व माहिती असलेला कागद चिकटविण्यात यावा. ही मदत मेळघाट आदिवासी क्षेत्रात वितरणासाठी पाठविण्यात येईल. सोबत दिलेल्या पत्त्यावर व वेळेत ही मदत पोहोचती करून द्यावी, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
पत्ता- नितीन गडकरी, यांचे जनसंपर्क कार्यालय
प्लॉट नं. 234, केला भवन, हिलरोड
रामनगर नागपूर.
दिनांक 1 ते 20 ऑगस्ट या दरम्यान
वेळ : सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत.