नागपूर : महाराष्ट्रात दररोज कितीतरी अपघात होत असतात. मोटार सायकलमध्ये चालकाचा अनेकदा मृत्यू झाल्याचे बघायला मिळते. यापार्श्वभूमीवर राज्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. मात्र नागपुरात हेल्मेटसक्तीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करायला मिळते. विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविण्यात नागपूरकर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महामार्ग पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मागील वर्षी नागपूर वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या ५ लाख ४४ हजार ७४६ दुचाकी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ कोटी २६ लाख ४६ हजार दंड वसूल केला. राजधानी मुंबईत ही संख्या १२ लाख १२ हजारांवर आहे. मुंबई वाहतूक शाखेने या वाहनचालकांकडून ६० कोटी ५७ लाख रुपये दंड घेतला.
नागपूर जिल्हा पोलिसांनी ९ हजार ७०४ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून ४८ हजार ४८ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. २०२२मध्ये वाहतूक पोलिसांनी ८३९ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मुंबईत ही संख्या ८९५ इतकी आहे. गेल्यावर्षी नागपुरात १,०८० अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये ३१० जणांचा बळी गेला तर १,१६९ जखमी झाले. नागपूर ग्रामीणमध्ये १,०७१ अपघातांमध्ये ४९१ जणांचा मृत्यू झाला. १,२६८ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.