नागपूर : कजाकिस्तान येथे झालेल्या आशियायी युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नागपूरच्या अल्फिया पठाण हिने मोलाची कामगिरी केली आहे. या चॅम्पियनशिपमध्ये अल्फिया पठाण हिने मंगळवारी रौप्य पदक पटकावले आहे.
अल्फियाला स्थानिक डायना मॅगौयायेवाकडून 4-1 ने पराभव पत्करावा लागला. माजी विश्व ज्युनियर चॅम्पियन अल्फियाने सामन्याची सुरुवात म्हणून केली. तिने 2019 मध्ये दुबई येथे अंडर-17 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये डायनाचा पराभव केला होता. स्थानिक प्रेक्षकांनी तिच्या प्रतिस्पर्ध्याला पाठिंबा दिला होता. तरी देखील अल्फियाने अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली. मात्र तिला सुवर्णपदक जिंकता आले नाही. हेवीवेट श्रेणीतील देशातील टॉप-रेट बॉक्सर्सपैकी एक असलेल्या अल्फियाने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये नागपूर विद्यापीठासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली खेळाडू म्हणून इतिहास रचला होता.