Published On : Wed, May 5th, 2021

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या आव्हानावर प्रहार नागपूरचे रक्तदान शिबिर

Advertisement

नागपुर – संपूर्ण जागत कोरोना महामारीने थैमान घातले आहे. आपल्या देशाला पर्यायाने महाराष्ट्र राज्याला सुद्धा या महामारीची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे. या महामारीवर सध्या तरी फक्त लसीकरण हाच एक पर्याय आहे. परंतु रक्तदान व प्लाझ्मा हा सुद्धा उपचाराचा पर्याय आहे.

राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समस्त राज्यातील प्रहरच्या कार्यकर्त्यांना स्वतः प्लाझ्मा दान करून मोठ्या प्रमाणात रक्तदान व प्लाझ्मा दान करण्याचे आव्हाहन केले. याच आव्हानाला मान देऊन महाराष्ट्र राज्य दिनाच्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहराच्या वतीने हिवरी नगर येथील शिव मंदिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख प्रशांत तन्नेरवार, शहर प्रमुख राजेश बोढारे, सहसम्पर्क प्रमुख शबिना शेख, ऋषी कुंवर, नकुल गमे, अरमान खान,दिनेश धोटे,असिफ शेख, सचिन पांडे उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले.या शिबिरात जवळपास ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले व १० दात्यांनी प्लझ्मा दान केले. आपल्या वक्तव्यात शहर प्रमुख राजेश बोढारे यांनी सांगितले की, अश्या प्रकारचे रक्तदान शिबिर समस्त शहरात प्रहारच्या वतीने आयोजित करण्यात येईल. सर्व प्रहार सेवक बच्चू कडू यांच्या आव्हाहणाला दाद देणार आहे.

सहसम्पर्क प्रमुख शबिना शेख यांनी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचे आव्हाहन केले. सदर रक्तदान शिबीर प्रहारचे नकुल गमे व ऋषी कुंवर यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.यावेळी प्रमुख रूपाने मुकुल कोरकलाई, विक्की रिधोरकर, कार्तिक कांबडी, चेतन बेलखेडे, चिराग वानखेडे, पवन चौधरी, लालू शेख, हरीश बोरकर, प्रशांत कदम, बालू तिजारे,दिपेंद्र शेगाये,दीपक किरपाने, किशोर उराडे व मोठ्या प्रमाणात प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement