नागपूर :क्रिडा विभाग, मित्र परिवार व प्रेस क्लब नागपूरच्या वतीने पश्चिम ऑस्ट्रेलियातील बसल्टन येथे नुकतीच पार 20 व्या जागतिक पूर्ण अंतराची ‘आयर्न मॅन’ ही शर्यत नुकतीच पार पडली.
या स्पर्धेत जगातील सर्वात तरुण ‘आयर्न मॅन’ नागपूरचा दक्ष खंते ठरला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दक्षचा गौरव करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ शनिवारी 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रेस क्लब ऑफ नागपूर, सिव्हील लाईन्स येथे होणार पार पडेल.
उपसंचालक क्रीडा शेखर पाटील यांच्या हस्ते दक्षचा सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रेस क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ नागपूरचे प्रभारी अध्यक्ष अमीत संपत यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाला सर्व प्रसारमाध्यमांचे क्रीडा प्रतिनिधी व फोटोग्राफर यांनी उपस्थित राहावे, ही विनंती करण्यात आली आहे.