Published On : Fri, Mar 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाला मिळाले प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार !

Advertisement

नागपूर: शहरातील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर या संस्थेस पियरे फॉचर्ड अकैडमी तर्फे आशियातील सर्वोत्कृष्ट असा इंटरनेशनल बेस्ट डेंटल इंस्टिट्यूट हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. येत्या ६ एप्रिल २०२५ ला कोलंबो, श्रीलंका येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे अधिष्ठाता डॉ.अभय दातारकर यांनी माहिती दिली.

पीएफए ​​ही सन्मानासाठी समर्पित असलेली एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्था आहे
1936 मध्ये डॉ. एल्मर एस. द्वारे स्थापित PFA ला 88 वर्षांचा वारसा आहे आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करीत आहे.
11 जागतिक क्षेत्रांमध्ये सुमारे 11,000 सदस्य आणि 142 हून अधिक देशांत अनुदान देणारी जागतिक स्तरावरील प्रसिद्ध संस्था आहे. ही संस्था दंत शिक्षण, संशोधन आणि सामाजिक सेवेमध्ये आघाडीवर आहे, ज्यामध्ये हे समाविष्ट असून खालील निकषांच्या आधारावर ह्या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

Gold Rate
Saturday 22 March 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900 /-
Silver / Kg 98,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

• १९८ प्रकाशने: प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे उच्च-प्रभावी संशोधन योगदान.

• ८ पुस्तके / २० पेटंट / ११३ कॉपीराइट: दंतचिकित्सा मध्ये नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा.

• २१ सतत दंत शिक्षण (CDE) कार्यक्रम: असंख्य उच्च-गुणवत्तेचे CDE कार्यक्रम आयोजित केले जातात.

• १६ परिषदा: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आयोजन आणि सहभाग.

• BDS आणि MDS विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक यश दर.

• ३.३३ CGPA सह A+ NAAC मान्यता:

• १४ वे NIRF रँकिंग: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक रँकिंगमध्ये स्थान.

• ८३ विद्यार्थ्यांचे यश: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी जिंकलेले उल्लेखनीय पुरस्कार.

• २१ संस्थात्मक पुरस्कार: शिक्षण, संशोधन आणि सेवेतील उत्कृष्टतेसाठी मागील शैक्षणिक सत्रात मिळालेला गौरव.
• ⁠ministry of health and family welfare तर्फे वर्ल्ड ओरल हेल्थ day सेलेब्रेशन करीत प्रथम पुरस्कार
• ⁠नो टोबैको डे सेलेब्रेशन करीता प्रथम पुरस्कार

या सर्व बाबींचा विचार करून नागपूर येथील प्रतिष्ठित शासकीय दंत महाविद्यालयाकरिता हा मानाचा पुरस्कार प्राप्त होत असून याचे श्रेय अधिष्ठाता यांनी सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना दिले आहे.

डॉ दातारकर यांना lifetime achievement award पियरे फॉचर्ड अकैडमी तर्फे अधिष्ठाता डॉ अभय दातारकर यांना lifetime achievement award घोषित करण्यात आला आहे. दंतवैद्यकीय क्षेत्रात अतिविशिष्ट सेवा तसेच आजपर्यंत केलेल्या कामाचा गौरव म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. पियरे फॉचर्ड अकैडमी द्वारे प्राप्त पत्रानुसार lifetime achievement award स्वीकारण्याकरिता ६ एप्रिल रोजी श्रीलंका येथे उपस्थित राहतील.

पुरस्कारांची हॅट्रिक –
पिएरे फॉचर्ड अकैडमी तर्फे या संस्थेस international community service excellence award देखील घोषित झाला असून या संस्थेने आदिवासी तसेच ग्रामीण आणि शहरी भागात केलेल्या मौखिक आरोग्यवर्धनाचा हा एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणता येईल. याशिवाय संस्थेतील डॉ रितेश कळसकर यांना outstanding dental educator या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याकरिता ही अभिमानाची बाब आहे. एखाद्या दंत वैद्यकीय शैक्षणिक संस्थेस एकाचवेळी एवढे पुरस्कार मिळणे ही गौरवास्पद बाब आहे.

Advertisement
Advertisement