Advertisement
नागपूर : रागाच्या भरात लहान भाऊ गोविंद विनायक चौखे (२५) याने मोठा भाऊ किसन विनायक चौखे (३६) याचा खून केल्याची संतापजनक घटना हिंगणा येथे घडली. गोविंदच्या मुलाने किसनच्या पत्नीला शिवीगाळ केली म्हणून हा वाद पेटला.
यादरम्यान गोविंदने किसनच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर आणि पाठीवर लाथा मारल्या, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली.पण नंतर गोविंदची आई प्रभा विनायक चौखे यांनी दिलेल्या जबाबावरून किसनची हत्या झाल्याचे समोर आले.पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.