नागपूर : राज्यभरात आज दहा दिवसाच्या उत्सवानंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत.तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी झाली असून सर्वत्र मिरवणुका निघण्यास सुरुवात झाली आहे.
नागपूरचा राजाची विसर्जन मिरवणुक दुपारी तुळशीबाग परिसरातून निघाली आहे. गेले 27 वर्ष नागपूरचा राजा गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागपूरचा राजाची तुळशीबाग परिसरात स्थापना केली जाते आहे.
नागपूर शहरापासून 20 किमी अंतरावरील कोराडीच्या तलावात नागपूरच्या राजाचे आज संध्याकाळी विसर्जन केले जाईल. दरम्यान अनंत चतुर्शदशीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर सज्ज झाले आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. नागपुरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली आहे.