नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला सर्वात चांगले रस्त्ते असलेले शहर म्हणून ओळखले जाते. पण नागपूरची ही ओळख आता भूतकाळात जमा होत चालली आहे. सध्या शहरातल्या बहुतांश रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. नागपुरातल्या किंग्सवे रोडची अवस्था बिकट झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
या रस्त्यावरून किंग्सवे हॉस्पिटलकडे जाण्यासाठी रुग्णवाहिकेला मोठा धोका आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नागरिकांची नाहीच नाही रुग्णांच्याही सुरक्षेची काळजी नसल्याचे दिसते. किंग्सवे हॉस्पिटलचा रस्ता खड्ड्यांनी भरला आहे. राज्यसरकारच्या रस्ते विकासाच्या माध्यमातून नागपुरात कोट्यवधींचे रस्ते बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र रस्त्यांची दुरावस्था जशीच्या तशीच होत चालली आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे