नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून जरांगे पाटील यांनी आंदोलन केले.मात्र याला ओबीसींनी विरोध केला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने ओबीसींना चर्चेला बोलावले आहे. यापूर्वी मराठा समाजाशी सरकारने चर्चा केली होती. आज मुंबई येथील सह्याद्री अतिथी सभागृहात ओबीसींची बैठक होत आहे. दरम्यान या बैठकीवर सर्व शाखीय कुणबी समाजाने बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने ओबीसींना चर्चेला बोलावले आहे. यापूर्वी मराठा समाजाशी सरकारने चर्चा केली होती.
आज मुंबई येथील सह्याद्री अतिथी सभागृहात ओबीसींची बैठक होत आहे. दरम्यान या बैठकीवर सर्व शाखीय कुणबी समाजाने बहिष्कार टाकला आहे, त्या पार्श्वभूमीवर काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे.राज्य सरकारने ओबीसी समाजाला चर्चेचे निमंत्रण दिले, परंतु त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
राज्य सरकारने या बैठकीला कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊ नये किंवा या आंदोलनात सक्रिय सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना बोलावावे, अशी मागणी शाखीय कुणबी समाजाने केली. त्यामुळेच या बैठकीत समाजाच्या प्रश्नांवर तोडगा निघेल, असे समाजाचे म्हणणे आहे.