Published On : Thu, Jun 20th, 2024

नागपुरच्या नरेंद्र नगरात प्लॉटच्या वादातून शेजाऱ्यावर कुऱ्हाडीने वार; व्हिडीओ व्हायरल

Advertisement

नागपूर : शहरातील नरेंद्र नगर परिसरीतील टायनी टॉट्स स्कूल जवळ राहणाऱ्या दोन शेऱ्यांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका चिघळला की आरोपीने कुऱ्हाडीने वार करत दुसऱ्यावर हल्ला केला.याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून घटनेनंतर आरोपी फरार आहे. दीपक देशमुख (50 ,रा. प्लॉट.9 श्री कॉम्प्लेक्स, नरेंद्र नगर) असे आरोपीचे नाव आहे. तर आनंद जोशी हे फिर्यादीचे नाव आहे.

Advertisement

माहितीनुसार,दीपक देशमुख आणि आनंद जोशी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. यातील जोशी यांचा प्लॉट 8 हा मोकळा असून त्या प्लॉटवर आरोपी देशमुख यांची नजर आहे.यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते जोशी यांच्यासोबत वाद घालत असतात. काल 19 जूनला याच मुद्द्यावरून देशमुख यांनी जोशी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.वाद चिघळल्यानंतर देशमुख यांनी जोशी यांना विटा फेकून मारल्या.तसेच त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला.यादरम्यान मोठा अनर्थ टळला आहे.हे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान या घटनेची तक्रार आनंद जोशी यांच्या पत्नी भारती जोशी यांनी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये दिली.पोलिसांनी आरोपी दीपक देशमुख यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 504,506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.