Advertisement
नागपूर : मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या MISS CENTRE INDIA FASHION UNION MADHYA PRADESH WINNER 2024 या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेरीत नागपूरची रसिक्ता काशिनाथ चव्हाण ही विजेता ठरली आहे.
रसिक्ता महालक्ष्मी रेसिडन्सी फ्लॅट नं. 302 न्यू नरसाळ येथील रहिवासी असून काशिनाथ चव्हाण यांची मुलगी आहे.
‘मिस सेंटर इंडिया फैशन यूनियन मध्य प्रदेश या स्पर्धेत एकूण 20 मॉडेलनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या पहिल्या दोन फेरीत प्रथम स्थान पटकाविल्याने कोरीओग्राफर केतन अमरकर यांनी तिचे अभिनंदन केले. रसिक्ता हिला मिळालेले हे यश नागपूरकरांसाठी गौरवाची बाब आहे.