नागपूर: आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू सात्वीक साईराज यांचे वडिलआणि शहरातील शिवाजी नगर जिमखान्याचे बास्केट बॉल खेळाडू विश्वनाथ यांचे आज सकाळी हृदय विकाराने निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी दोन मुले चरण, सात्वीक व बराच मोठा आप्त परिवार आहे.
नागपूर च्या बास्केट बॉल खेळाडूंच्या वतीने विश्वनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विश्वनाथ हे नागपूरच्या शिवाजीनगर जिमखान्याचे बास्केट बॉल खेळाचे उत्कृष्ट खेळाडू होते. विश्वनाथने बास्केट बॉल, व्हॉलीबॉल या खेळात नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच त्यांनी प्रा. अरुण दाणी यांच्या मार्गदर्शनात बास्केट बॉल खेळाचे धडे गिरवले.