नागपूर : नागपूरचा सुपुत्र सौरभ येवले याने UPSC २०२४-२५ च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात गुणवत्ता यादीत ६६९ वा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सौरभच्या या यशामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौरभ येवले याने आपले शालेय शिक्षण नागपूरमधील भवन स्कूल येथे पूर्ण केले असून, पुढील शिक्षण शिवाजी महाविद्यालय येथे घेतले. त्यानंतर त्याने NIT दिल्ली येथून २०२२ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली.
अभ्यासात सदैव हुशार असलेल्या सौरभने UPSC सारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सौरभ हे मा. राज्यपाल यांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश येवले यांचे पुत्र आहेत.
तसेच कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ येथील अधीक्षिका सौ. माधुरी येवले ह्यांचा तो सुपुत्र आहे. या यशाबद्दल सौरभचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत असून, युवकांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरत आहे.