नागपूर : ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत जनतेसाठी खुला राहणार आहे. ओळखीचा पुरावा सादर केल्यानंतरच किल्ल्यात प्रवेश दिला जाईल. हा प्रवेश रेल्वे स्टेशनसमोरील आर्मी रिक्रूटिंग ऑफिस गेटमधून होईल, असे रत्नाकर सिंग( ग्रुप कॅप्टन, डिफेन्स पीआरओ, नागपूर) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नागपूर महाराष्ट्राच्या उंच टेकडीवर वसलेला सीताबर्डी किल्ला. हा गड किल्ले मुधोल जी २ भोसले म्हणजे अप्पासाहेब भोसले यांनी बांधला होता. हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध एंग्लो-मराठा युद्धाच्या लढाईपूर्वी बांधला गेला होता. सीताबर्डी हे आता नागपूरचे एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक केंद्र बनले आहे.