डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मा.कांशीराम यांचे स्वप्न साकार करा-अँड.संदीप ताजने
मुंबई: दलित, शोषित, पीडित, उपेक्षित समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम डॉ.बाबासाहेबांनी केले. तर, समाजबांधवांमध्ये सामाजिक, राजकीय नेतृत्वाकरीता विश्वास मा.कांशीराम यांनी निर्माण केला. बहुजन समाज पार्टीची सुरूवातच नागपूर मधून झाली आहे. अशात नागपूर महानगर पालिकेवर अभिमानाने ‘निळा झेंडा’ फडकवण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शुक्रवारी नागपूरात आयोजित ‘संवाद यात्रे’च्या कार्यक्रमातून पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना दिल्या.
नागपूर महानगर तसेच जिल्ह्यात बसपाची संघटनात्मक ताकदीचा रचनाबद्द तसेच नियोजनबद्दरित्या वापर केल्यास पालिकेवर निळा झेंडा सहज फडकावता येवू शकते, असे अँड.ताजने म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूरकरांवर बरेच प्रेम होते. सामाजिक बदलाची मोठी चळवळ नागपूरातून सुरू झाली. अशात राज्यात सत्ताधारी होण्याची सुरूवात नागपूर महानगर पालिकेवर निळा झेंडा फडकवून करणार असल्याचे, अँड.ताजने म्हणाले.
सर्वसमावेश विकासासाठी बसपाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी मा.बहन मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेतृत्व आनंद आकाश यांच्या नेतृत्वाखाली सज्ज आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आतापासून बैठका आणि कॅंडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. बसपाकडून विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून मतदारांना जागृत करण्याचे काम केले जाईल.जिल्ह्यात आतापर्यंत १२ ‘कॅडर कॅम्प’ शिस्तबद्दरित्या आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत १० ते १२ नगरसेवक यापूर्वी पक्षाने निवडूण आणले आहे. पंरतु, यंदा बसपाचा महापौर बसणारच, असा दावा अँड.ताजने यांनी केला.
कार्यक्रमात प्रदेश महासचिव नागेाराव जयकर, सुनील डोंगरे, रवींद्र गवई, जिल्ह्या प्रभारी नितीन कुमार शिंगाडे, विजयकुमार डहाट, बाबुल डे, जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, शहर अध्यक्ष इंजि.राजीव भांगे, गट नेते जितेंद्र घोडेस्वार,वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, इब्राहिम टेलर,मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, ममता सहारे, नरेंद्र वालदे, संजय बुरेवार तसेच जिल्हा पदाधिकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तरूण नेतृत्वाला प्राधान्य-मा.प्रमोद रैना
बसपा केवळ बहुजनांसाठीच नाही तर, सर्वजनांसाठी आहे. सर्वसमावेशकताच पक्षाची मोठी ताकद आहे.तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाकडून ५० टक्के तरूणांना भागीदारी दिली जाईल. पक्षाकडून आगामी नागपूर पालिकेच्या निवडणुकीत शिक्षण, गुणवत्ता, सामाजिक कार्याची जाण तसेच समाजसेवकरिता व्रतस्थांना उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे राज्य प्रभारी मा.प्रमोद रैना यांनी दिली. सर्वजनांच्या हितासाठी आणि सर्वजनांना सुखी करण्यासाठीच बसपा कार्यरत असल्याचे ते म्हणाले.