Advertisement
नागपूर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच महायुतीच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडणार आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. तर शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा साधला.
मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता भारतीय जनता पक्ष म्हणजे काय ते कळेल. त्याची सुरुवातही झाली आहे.
यासोबतच महायुतीचे सरकार जनतेच्या मतांनी जिंकलेले नाही. भाजपचे लोक दिल्लीत बसले आहेत.त्यांच्यामुळेच महायुतीचा विजय झाल्याचा आरोप पटोले यांनी केला.