नागपूर: देशात लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला.यात भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला 293 जागा मिळाल्या असून इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या.यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत 30 जागा मिळविल्या.राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
या निकालानंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे.अशातच आता काँग्रेसने नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत नागपुरात होर्डिंग लावले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या पोस्टरवर काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस नेते गिरीश पांडव यांचाही फोटो आहे
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने 543 लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर केला आहे. यात भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 99 जागा मिळवता आल्या आहेत.