नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ४८ तासांत सुमारे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये काही नवजात बालकांचाही समावेश होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता याच रुग्णालयात गेल्या आठ दिवसांत एकूण १०८ जणांचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या आठ दिवसात सुमारे १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत एका अर्भकासह ११ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचा औषधा अभावी मृत्यू होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे यांनी हे वृत्त फेटाळला आहे.