Published On : Mon, Nov 21st, 2022
By Nagpur Today Nagpur News

नारायणा विद्यालयाने पटकावले ‘सायन्‍स क्‍वीझ’चे विजेतेपद

Advertisement

– मा. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते आज विज्ञान संचारकांचा सत्‍कार
– अपूर्व विज्ञान मेळावा बघण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांची गर्दी

नागपूर: असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा भवन येथे सुरू असलेल्‍या अपूर्व विज्ञान मेळाव्‍यात शनिवारी ‘सायन्‍स क्‍वीझ’ची अंतिम फेरी पार पडली. भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग विज्ञान प्रसारच्‍या सहयोगाने घेण्‍यात आलेल्‍या ‘जिज्ञासा’ या सायन्‍स क्‍वीझचे विजेतेपद नारायणा विद्यालयाच्‍या चमूने पटकावले.

Gold Rate
Tuesday 25 March 2025
Gold 24 KT 87,900 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 98,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

16 तारखेपासून राष्‍ट्रभाषा भवन येथे अपूर्व विज्ञान मेळावा सुरू असून यात महानगरपालिकेच्‍या 32 शाळांमधील 6 ते 10 व्‍या वर्गाच्‍या 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्‍यांनी 100 हून अधिक विज्ञान प्रयोग सादर केले आहेत. हे प्रयोग बघण्‍यासाठी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी गर्दी करीत आहेत.
मेळाव्‍यादरम्‍यान, 18 व 19 नोव्‍हेंबर रोजी ‘सायन्‍स क्‍वीझ’ घेण्‍यात आली. यात शहरातील 34 शाळांमधील 136 विद्यार्थी सहभागी झाले होते.

अंतिम फेरीमध्‍ये नारायणा विद्यालय, स्‍कूल ऑफ स्‍कॉलर्स अत्रे लेआऊट, केंद्रीय विद्यालय, स्‍कूल ऑफ स्‍कॉलर्स वानाडोंगरी व सोमलवार हायस्‍कूलची चमू अंतिमसाठी निवड झाली. शनिवारी झालेल्‍या अंतिम फेरीमध्‍ये नारायणा विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर स्‍कूल ऑफ स्‍कॉलर्स अत्रे लेआऊटची चमू द्वितीय व केंद्रीय विद्यालय तृतीय पुरस्‍काराचे मानकरी ठरले. यावेळी झालेल्‍या पुरस्‍कार वितरण सोहळ्याला असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) चे अध्‍यक्ष शुक्‍ला, अजय महाजन, क्‍वीझ मास्‍टर सचिन नरवडे, शारदा अग्रवाल, श्रीमती कुलकर्णी, कविता स्‍वाईन व रामकृष्‍णन यांची उपस्‍थ‍िती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विजेत्‍या चमूंना पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्‍यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती रामकृष्‍णन यांनी केले तर आभार हसन शफीक यांनी मानले.

आज विज्ञान संचारकांचा सत्‍कार
रविवार, 20 नोव्‍हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते विज्ञान संचारकांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. शालेय शिक्षणाला अधिक मनोरंजक, सोप्‍या प्रयोगांवर आधारित बनवण्‍याच्‍या अभियानात सक्रीय आलेल्‍या देशभरातून आलेल्या 40 विज्ञान संचारकांचा यावेळी सत्‍कार केला जाईल. गोवा, उत्‍तराखंड, उत्‍तरकाशी, बिहार, मध्‍य प्रदेश, उत्‍तर प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू कश्‍मीर, कर्नाटक अशा एकुण 14 राज्‍यातील विज्ञान संचारकांचा त्‍यात समावेश आहे.

Advertisement
Advertisement