अतिशय नाजूक परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी मिळविले यश
वाणिज्य शाखेतून 85.23 टक्के घेऊन पायल शिवने तालुक्यात प्रथम
रामटेक: नुकताच 12 वी चा निकाल लागला. कला व वाणिज्य शाखेतून विद्यार्थ्यांनी बाजी मारली नरेंद्र तिडके कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विभागातून पायल गंगाप्रसाद शिवणे 85.23% घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला ,आशिष सुभाष बामचेर 79.84%गुण घेऊन उत्तीर्ण झाले.तर कला विभागातून निखिल काटवले 71.69%,मनीष मेश्राम 70.76%गुण प्राप्त केले.विद्यार्थ्यांनी मिळवीलेल्या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थांचा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .संगीता टक्कामोरे , प्रा . डॉ . महेंद्र लोधी व स्टाफ नी सत्कार करून त्यांचा गौरव केला .अत्यंत हालाखीची व नाजूक परिस्थिती असून आई वडील रोजमजुरी करून कुटुम्ब चालवितात .परिस्थिती अतिशय नाजूक व हालाखीची असल्याने कॉलेज घरापासून 10 ते 12 किलोमीटर वर असल्यामुळे व रामटेक सारख्या तालुक्याच्या ठिकाणी होस्टेल ची व्यवस्था नसल्याने कधी सायकल ने तर कढी मिळेल त्या साधनाने तर कधी पायपीट करत कॉलेजला येउन बारावीच्या परीक्षेत ग्रामीण च्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेत जे यश प्राप्त केले त्याबद्दल त्यांचे वर सर्व बाजूने अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे . महाविद्यालयातुन प्राविण्यात प्रथम श्रेणीत तसेच पास झालेल्या मुलामुलींनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ .संगीता टक्कामोरे ,प्रा.डॉ .महेंद्र लोधी ,तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व्रुण्द तसेच आई,वडील यांना दिले आहे
अतिशय नाजूक परिस्थितीचा सामना करून गुणवत्ता यादीत आपले नाव कायम ठेवण्यात यशस्वी तर झालो मात्र एवढे गुण मिळवुनही पुढचे शिक्षण कसे घ्यायचे हा यक्ष प्रश्न त्यांचे समोर असून पुढचे शिक्षण आम्ही कसे घेणार . आमच्या परिस्थितीला ते झेपणार नाही अशी निराशा त्यांनी व्यक्त केली . जिद्द व चिकाटी असली तर यश नक्कीच मिळते. मिळाल्या यशाबदल आनंदही त्यांनी व्यक्त केला .