अनेक ओबीसी गोरगरीब गरजू युवक, युवती, विद्यार्थी, विधवा स्त्रियांना व लोकांना सक्षम बनविण्यासाठी व शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत असलेल्या योजनेचे लाभ घेण्याकरिता शांतीनगर नागपूर येथे उद्घाटन करण्यात आले या ई-सेवा केंद्राचे उद्घाटक डॉ. शरयू तायवाडे व सौ. वृंदा विकास ठाकरे या होत्या तर अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बबनरावजी तायवाडे सर होते.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनरावजी तायवाडे म्हणाले की ओबीसीच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाने राबवण्यात आलेली महाज्योती व इतर योजना प्रत्येक ओबीसी पर्यंत कशी पोहोचवावी यावर मार्गदर्शन केले व प्रत्येक ओबीसींनी शासनाने राबविण्यात आलेल्या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन केले व या ई-सेवा कार्यालयाचे आयोजिका राष्ट्रीय ओबीसी युवती महासंघाची नागपूर शहर अध्यक्षा सौ. रुतिका मसमारे (डाफ) यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.
उद्घाटक डॉ. शरयू तायवाडे व सौ. वृंदा विकास ठाकरे यांनी शुभेच्छा देताना म्हटले की या ई-सेवा केंद्राचे प्रत्येक विभागात प्रत्येक गावागावात उभारण्यात यावा व ओबीसींना गरजू लोकांना मदत होईल.
अतुल लोंढे म्हणाले की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ई-सेवा केंद्र ओबीसींच्या विद्यार्थ्यांना व लाभार्थ्यांना लाभदायक ठरेल.
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव प्रा. शरदजी वानखेडे, महासंघाचे पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ झोडे, अतुलजी कोटेचा, पुरषोत्तम हजारे, नितीनजी साठवणे, अयाजभाई शेख, अवंतिका लेकुरवाळे, मिनाक्षीताई ठाकरे, विजया धोटे, विना बेलगे व आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन महेंद्र उईके, आभार गायत्री उईके यांनी व्यक्त केले व या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता श्रीकांत मसमारे, संदीप दिग्रस यांनी श्रम केले.