नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसध्येंवर सोमवार दिनांक 7 ऑक्टोंबर , 2019 रोजी, नागपुर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ” भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा ( भीम सैनिक रैली ) ” संपन्न होत आहे.
दरवर्षी प्रमाणे होत असलेल्या भीमसैनिकांच्या राष्ट्रीय मेळाव्याचे हे ३९ वे वर्ष असून विविध राज्यातील प्रतिनिधी मोठया संख्येत सहभागी होतील. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या रिप. युथ फोर्स , दलित मुक्ति सेना , रमाई ब्रिगेड , राष्ट्रीय विद्यार्थी सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, अल्पसंख्यांक आघाडी, ओबीसी सेल, किसान आघाडी या विविध घटकांची चर्चासत्रे सकाळी 11 ते 5 पर्यत चालेल व 5:30 वाजता, खुल्या अधिवेशनाचे उट्घाटन आंध्र प्रदेशचे माजी मंत्री मा. गोलापल्ली सुर्याराव यांचे हस्ते होणार आहे. पीरिपा चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.
असे पत्र परिषद मध्ये सांगितले. रिपब्लिकन चळवळीतील जेष्ठ नेते नानासाहेब इंदिसे, पैंथर नेते मा.गंगाधर गाडे, सौ . सुर्यकांता गाडे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहतील.
याप्रसंगी कार्याध्यक्ष व युवा नेते जयदीप कवाडे , सुप्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ.ताराचंद्र खांडेक, दलित मित्र गोपालराव आटोटे, अॅड. जे.के. नारायणे, गणेशराव पडघन, पी.के.गजभिये , मा.इ. मो.नारनवरे, प्रकाश मुलभारती, अशोक शाह वानखेडे , सुरेशभाई सोनवणे, पक्ष प्रवक्ते चरणदास इंगोले , जगनभाई सोनवणे, अजमल हसन पटेल, राजा इंगळे, इकबाल कन्नन, रत्नाताई मोहोड , चौ. छत्रपाल सिंग, विजयकुमार कश्यप , अॅड दलित राजगोपालन , एम.प्रेमकुमार , मिलींद सूर्वे , गणेशभाई उन्हवणे , नंदकुमार गोंधळी , संजय भैय्या सोनवणे आदि नेते खुल्या अधिवेशनात सहभागी होतील. धर्मनिरपेक्ष आघाडीतील सहभागी पक्ष प्रमुखांना देखील खुल्या अधिवेशनामध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. पक्षाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. थॉमस कांबळे हे मेळाव्याचे निमंत्रक असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष अरूण गजभिये हे स्वागताध्यक्ष राहतील. असे पत्र परिषद मध्ये सांगितले.