Published On : Mon, Sep 4th, 2017

महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Advertisement

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना उद्या राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2017 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘शिक्षक दिना’निमित्त येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2016-17 वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री तथा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्रातील एकूण 25 शिक्षकांची निवड ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2016-17’ साठी झाली आहे. यात एकूण 17 प्राथमिक शिक्षक असून यापैकी 2 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. 8 माध्यमिक शिक्षकांना सन्मानीत करण्यात येणार असून 1 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत.

या 17 प्राथमिक शिक्षकांना गौरविण्यात येणार
नागोराव तायडे, महानगर पालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.2, घाटकोपर(प.) (मुंबई), उज्ज्वला नांदखिले, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, साडेसतरा नळी, ता.हवेली (पुणे), शोभा माने, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, चिंचणी, ता. तासगांव(सांगली), तृप्ती हतिसकर, महानगर पालिका प्राथमिक शाळा, प्रभादेवी (मुंबई), सुरेश शिंगणे, जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगांव चिलमखा, पो. उंबरखेड, ता. देऊळगांव राजा(बुलडाणा), संजिव बागुल,जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, सांभवे, पो. माळे ता.मुळशी (पुणे), राजेशकुमार फाटे ए.टी., जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, डोंगरगांव, पंचायत समिती लाखनी (भंडारा), ज्योती बेलावळे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, केवनीदिवे, पो. काल्हेर, ता. भिवंडी (ठाणे), अर्जुन ताकटे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा,अहेरगांव, ता. निफाड(नाशिक), रुख्मिणी कोळेकर, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, वांगी-2, ता. करमाळा (सोलापूर), रामकिशन सुरवसे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, नागोबावाडी, ता.औसा(लातूर), प्रदीप शिंदे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, शिलापूर, ता.जि.(नाशिक),अमीन चव्हाण, जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, निंभा, पो. देऊरवाडा, ता.दिग्रस (यवतमाळ), उर्मीला भोसले, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, महालदारपुरी, ता.वाशी (उस्मानाबाद), गोपाल सुर्यवंशी ,जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, गंजुरवाडी, ता.जि.(लातूर) या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत अर्चना दळवी, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, बाहुली, ता.हवेली (पुणे), सुरेश धारव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाड क्र.2 ता. निफाड(नाशिक) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. उपरोक्त पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक हे सहायक शिक्षक आहेत.

9 माध्यमिक शिक्षकांना गौरविण्यात येणार
माध्यमिक शाळांच्या शिक्षकांमध्ये तीन मुख्याध्यापक व सहा सहायक शिक्षकांना सन्मानीत करण्यात येणार आहे. या शिक्षकांमध्ये नंदा राऊत, मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, ता.आष्टी(बीड), स्मीता करंदीकर, अहिल्यादेवी मुलींची उच्च माध्यमिक शाळा, होळकरवाडा, शनिवार पेठ, पुणे(पुणे), नंदकुमार सागर(मुख्याध्यापक), जिजामाता उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,जेजुरी, ता. पुरंदर(पुणे), शर्मीला पाटील, अं‍बिका विद्यालय, केडगांव, ता.जि.(अहमदनगर), सुनील पंडीत (मुख्याध्यापक), प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीपेठ,अहमदनगर (अहमदनगर), कमलाकर राऊत, योगेश्वरी नुतन विद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई(बीड),संजय नारलवार(मुख्याध्यापक), प्रियंका उच्च माध्यमिक शाळा, कानेरी, ता. जि. (गडचिरोली) यांचा समावेश आहे.

माध्यमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत डॉ. मिनल सांगोळे मुक-बधिर शाळा, उत्तर अंबाझरी रोड, शंकरनगर नागपूर, (नागपूर) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पदक, प्रमाणपत्र आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Advertisement
Advertisement