Advertisement
मुंबई: महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भात आजची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली होती अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस व शिवसेना यांचा जाहीरनामा आणि आगामी निवडणूका व पक्षवाढी संदर्भात यावर सविस्तर चर्चा झाली असेही जयंत पाटील म्हणाले.