Published On : Sat, Oct 13th, 2018

लोडशेडिंगविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे ‘कंदील’ आंदोलन…

Advertisement

मुंबई : लोडशेडींगमुळे (भारनियमन) राज्यातील जनता हैराण झाली असून याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज ज्या-ज्याठिकाणी लोडशेडिंग (भारनियमन) आहे त्याठिकाणी ‘कंदील’ आंदोलन करुन सरकारला जागं करण्याचं काम केलं तर युवक संघटनेने वीजमहावितरण कार्यालयासमोर निदर्शने करत सरकारचा निषेध केलाच शिवाय यावेळी अधिकाऱ्यांना ‘कंदील’ भेट देण्यात आला.

राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असतानाच आता वीजमहावितरण महामंडळाकडून लोडशेडिंग ( भारनियमन ) केले जात असल्याने सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज ज्याठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे त्याठिकाणी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ठिकठिकाणी युवक संघटनेच्यावतीने निदर्शने करुन निषेध करण्यात आला शिवाय महावितरण विभागाला निवेदनही देण्यात आले.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार आज राज्यात ज्या ज्याठिकाणी लोडशेडिंग ( भारनियमन ) सुरु आहे त्या त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘कंदील’ आंदोलन करत सरकारला जागं करण्याचं काम केलं. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या गेटला कंदील अडकवून महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर युवक अध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ठिकठिकाणी वीजमहावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय आजपासून तीन दिवस युवक संघटनेच्यावतीने लोडशेडिंगविरोधात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संग्राम कोतेपाटील यांनी दिली.

Advertisement
Advertisement