नागपूर: शहरात शनिवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. यातच नागपुरातील मध्यवर्ती भाग असलेल्या सीताबर्डी बाजारपेठ परिसरात हायड्रोलिक पार्किंगची व्यवस्था असूनही नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.’नागपूर टुडे’ने सीताबर्डीतील हायड्रोलिक पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला.
रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण –
हायड्रोलिक पार्किंगचा अगोदरच याठिकाणी असलेल्या दुकानदारांना फटका बसला. आता याठिकणी हायड्रोलिक पार्किंगची व्यवस्था असूनही आजूबाजूला फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे वाहन आणि दुचाकीला मार्गच उरला नाही. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पायदळी चालणाऱ्याच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून साचले चिखल-
सीताबर्डीतील फेरीवाले रस्त्यांवर असल्याने हा मार्ग पूर्णत: अरुंद झाला आहे. त्याचा फटका सर्व प्रकारच्या वाहनचालकांना तसेच ग्राहकांना बसत आहे. तसेच नागपुरात पडत आलेल्या सततच्या पावसामुळे येथील रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळत आहे.