अशोक धवड अध्यक्ष असलेल्या वरील बँकेत ३८करोड ७५ लाख रुपयांचे घोटाळे उघडकीला आले असून आज या प्रकरणात अशोक धवड व इतर आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शासनाने उत्तर दाखल केले , उदया अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे,यापूर्वी अशोक धवड यांनी तात्पुरता अटकपूर्व जमीन घेतला आहे , आता त्या अर्जावर अंतिम सुनावणी होणार आहे.
आता पर्यंत ह्या घोटाळ्यात ६ आरोपींना अटक झाली आहे, विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पाटील यांचे न्यायालयात आज सरकारतर्फे अर्जावर अंतिम सुनावणी चे वेळेसअशोक धवड यांना कोर्टात उपस्थित रहावे या साठी अर्ज दाखल करण्यात आले त्यावर न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून श्री अशोक धवड व इतरांना उद्या न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत.
प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री नितीन तेलगोटे हे शासनातर्फे बाजू मांडत आहेत ,ह्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक फुलपगारे करीत आहेत…आज आरोपीं तर्फे ऍड निलेश फुलझेले आणि ऍड आंबिलवाडे हे हजर होते.