Published On : Tue, Sep 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

भव्य कलश, कावड यात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी ला नवरात्र महोत्सवाची सुरूवात

पिपरी-कन्हान येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

कन्हान : – पिपरी या मुळ गावातील जागृत प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात नवरात्र महोत्सव सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती पिपरी व्दारे पावन कन्हान नदीचे जल १२१ कलशात भरून नवदुर्गाच्या नवरथा सह भजन, अखाडा, डिजे व दुर्गा मातेच्या जयघोषात भव्य कलश, कावड यात्रा कन्हान ते पिपरी मंदीरात पोहचुन मातेचे अभिषेक, विधीवत पुजा, अर्चना, घटस्थापना, आरती करून भाविकांनी धार्मिक आंनद घेत सुरूवात करण्यात आली.

Gold Rate
Friday 28 Feb. 2025
Gold 24 KT 85,400 /-
Gold 22 KT 79,400 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवार (दि.२६) सप्टेंबर ला सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती पिपरी व्दारे सकाळी १० वाजता कन्हान नदी पात्रात पुजा अर्चना करून नागपुर जबल पुर राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटक पासुन ९५ नव कन्या डोहीवर कलश व २६ कावडधारी पुरूष १२१ कलशासह पायदळ, घोडयावर राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, अवंतीबाई लोधीच्या वेशभुषेत शिस्त बध्य नवदुर्गेच्या नव रथासह भजन मंडळीच्या गजरा त, शिवकालीन मराठा अखाडा बोरी, भाविक दुर्गा मातेचा ध्वज उंच लहवित डिजेच्या तालावर दुर्गा माते च्या जय घोषाने कन्हान नगरी दुमदमवुन भक्तीमय वातावरणात महामार्गाने मार्गक्रमण करित आंबेडकर चौकातुन पिपरी मार्गे दुर्गा माता मंदीरात भव्य कलश, कावड यात्रा पोहचुन मंदीरातील मातेचे पंचामृत आणि कन्हान नदीच्या पावन कलशातील जलाने अभिषेक करित विधीवत पुजा अर्चना व घटस्थापना, आरती करून नवरात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली.

नवदिवस विविध धार्मिक कार्यक्रम जागरण, सोमवार (दि.३) ला यज्ञहवन पुजन, मंगळवार (दि.४) ला सायंकाळी ४ वाजता पासुन महाप्रसाद आणि बुधवार (दि.५) ला सायंकाळी ७ वाजता रावण दहन करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल. या भव्य कलश कावड यात्रेसह नवरात्र महोत्सवाच्या यशस्विते करिता सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती पिपरी चे व्यवस्थापक अध्यक्ष माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव, अध्यक्ष देवा चतुर, उपाध्यक्ष अमोल सुटे, शितल भिमणवार, सचिव फजित खंगारे, कैलास पवार, कोषाध्यक्ष प्रमोद मोटवानी, बाला खंगारे, सह कोषाध्यक्ष मनोज कुरडकर, सजावट अजय भोस्कर, आशिष वानखेडे, शालीकराव ठाकरे, सोनु येलमुले, स्वप्निल फुलझेले, अशोक मेश्राम, गोपा ल मसार, अनिल चापले, राधेश्याम भोयर, हरदास ठाकरे, अमोल भोयर, कुंदन डांगे, तुषार येलमुले, सोनु कुरडकर, आकाश खडसे, विक्रम तिवाडे, दिपक ताजणे, रवि अजबजे, विनोद हाडगे, कुणाल आगुलेट वार, अनिकेत चापले, ज्योती येलमुले, रमाबाई येलमु ले, वंदना कुरडकर, कल्पना खंगारे, शामली खंहारे, मंगला येलमुले, दुर्गाबाई कोरवते, रोशनी कुरडकर, पार्वती खंगारे, भारती तिल्लीखेडे, निर्मला खंगारे, सुनंदा फुलझेले, सोनाली सुटे, संगिता तिवाडे, शारदा बावने, श्रेया नगरकर, उषा खडसे, निकीता चतुर, सुरेखा तिवाडे, रोशनी पंधरे, सुशिला चापले, संगीता मसार, सावित्री खंगारे, अंजु नगरकर, मिना चतुर, मिनाक्षी चन्ने, बबलीताई छानिकर, राधाबाई भोयर, पोर्णिमा डांगे सह सर्व सदस्य व पिपरी ग्रामस्थ अथक परिश्रम करित आहे.

Advertisement