Advertisement
दोन्ही उमेदवार विधानपरिषदेत उत्तम कामगिरी करतील;प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खात्री.
मुंबई : – राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील अशी खात्री प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.