नागपुर: आज राष्ट्रवादी युवतीं काँग्रेस नागपुर शहर अध्यक्ष पूनम रेवतकर तर्फे नागपुर शहर येथील विविध ठिकाणी कोरोना काळात नाकाबंदी वर कार्यरत असणाऱ्या पोलीस बंधु व भगिनी यांना फेस शील्ड ,कापड़ी मास्क व सैनिटाइजरचे वाटप करण्यात आले. गणेशपेठ, अंबाझरी,मानकापुर व कोराडी पोलीस स्टेशन व स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाकाबंदी पॉईंट वर कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.
या वेळी गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. भारत क्षीरसागर सर, अंबाझरीचे पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र हिवरे सर, मानकापुरच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे मॅडम , ट्रॅफिक सदर विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. जगवेंद्र राजपूत सर व कोराडीचे पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा शिंदे सर यांची भेट झाली.
या वेळी नागपुर शहर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष नूतनताई रेवतकर यांची मदत झाली. कोरोना काळात ही कार्यत्तपर राहून जनतेसाठी कार्य करणाऱ्या पोलीसांचे मनापासून आभार सुद्धा मानले.