Published On : Mon, Feb 21st, 2022

शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाचीच आज गरज : आ. चंद्रशेखर बावनकुळे 

Advertisement

मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने शिवकालीन शास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम गणेशनगर येथील महावीर मैदानावर आयोजित करण्यात आला. यावेळी लाठी-काठी, तलवारबाजी, भाला, दांड-पट्ट्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करणाऱ्यांचे भाजापाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले.    

आजच्या काळात अशाच दिशादर्शक कार्यक्रमाची समाजाला गरज असल्याचे मत यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. मुलीना दुर्बल म्हणण्यापेक्षा आत्मसरंक्षण शिकविणे गरजेचे आहे. मुली लढू शकतात.

Advertisement

त्या संघर्ष करू शकतात. पराक्रम गाजवून समाजाची मान उंचावू शकतात अशी भावना समाजात निर्माण होणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष आदित्य खोब्रागडे, नगरसेविका (प्रभाग ३१) शीतल कांबळे, नागपूर शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सोनाली घोडमारे, संस्थेचे सचिव अभिषेक उरकुडे आणि हेड प्रोटेक्शन सेल्फ अभिषेक काळबांडे उपस्थित होते.