चंद्रपुर: राज्याचे अव्वर मुख्य सचिव शामलाल गोयल व उपसचिव महाजन पाणी व स्वच्छता विभाग मंत्रालय यांनी नुकतीच चंद्रपुर जिल्हयाच्या दौ-यावर येवुन गावांना भेट दिली आहे. आरोग्य सुरक्षित राखायचे असेल तर प्रत्येक ग्राम शाश्वत स्वच्छ असले पाहिजे, याशिवाय पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, गावाचा परिसरही नियमित स्वच्छ ठेवुन, शौचलयाचा नियमित वापर करायला हवा. शाश्वत स्वच्छ ग्राम काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे अव्वर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी ग्रामस्थांशी चर्चा करतांना व्यक्त केले.
चंद्रपुर जिल्ह्याच्या दौ-यावर असतांना भद्रावती तालुक्यातील पवना रैयत, काट्वल भगत, मुल तालुक्यातील भादुर्णी व सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी यागावांना भेटी दिल्या. गावस्तरावर स्वच्छ भारत कोष निधी मधुन निर्माण झालेल्या शौचलयाची पाहणी करुन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शौचालय वापर का गरजेचा आहे याविषयी मौलिक सल्ला सुध्दा ग्रामस्थांशी चर्चा करतांना दिला.
गावस्तरावर जलस्वराज्य कार्यक्रम दोन अंतर्गत लावण्यात आलेले डिफ़्लोराईडेशन युनिटला भेट देवुन युनिट द्वारा मिळाणारे पाणी व प्रत्येक्ष स्त्रोताचे पाणी नुमना घेवुन ओटी टेस्ट करण्यात आली व पाण्या मध्ये फ़्लोराईड मात्रा किती प्रमाणात आहे तपासण्यात आले. याशिवाय डिफ़्लोराईडेशन युनिट बाबत ग्रामस्थांशी चर्चा करुन माहिती जानुन घेतली.
जिल्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम जोमात सुरु असुन , गाव भेटी दरम्यान गावात एका वृक्षारोपन वृक्ष संवर्धनाचा संदेश सुध्दा ग्रामस्थांना यावेळी दिला. चंद्रपुर भेटी दरम्यान चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दशरथ पिपरे, जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता वाघ, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, संजय धोटे, साजिद निजामी , भद्रावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, मुल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदिप पांढरबडे, सिंदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक ईल्लुरवार उपस्थित होते.