नागपूर: देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारी, महागाई आणि विकासासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हे चुकीचे असल्याचे मत नागपुरातील सुप्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलताना व्यक्त केले.
विकास ठाकरे गडकरींना देणार ‘काटे की टक्कर’ –
नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.तर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये होणारी लढत ही चुरशीची असेल असे मत मैत्र यांनी व्यक्त केले. यंदा विकास ठाकरे हे गडकरी यांना ‘काटे की टक्कर’ देणार असल्याचे मैत्र म्हणाले. फार कमी लिडने गडकरी निवडणूक जिंकणार असल्याचेही ते म्हणाले.
आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर –
लोकसभा निवडणुकीमध्ये बेरोजगारी, महागाई आणि विकासाच्या मुद्द्यांकडे तर दुर्लक्ष होतच आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांच्या अभावांनाही तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य सुविधा इतक्या महागल्या आहेत की त्या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे मैत्र म्हणाले.