Published On : Wed, Aug 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नेपाळमध्ये महापुराचा कहर; १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता, मानसरोवर यात्रेकरूंवरही संकट

Advertisement

नेपाळमध्ये महापुराचा कहर; १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता, मानसरोवर यात्रेकरूंवरही संकट

काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली असून मोठ्या प्रमाणात पर्यटक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळ पर्यटन बोर्डाच्या माहितीनुसार, पुराच्या तडाख्यात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या ३१ भारतीय यात्रेकरूंचाही समावेश आहे. बेपत्ता भारतीय नागरिकांची ओळख आणि त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

जवळपास ४०० पर्यटक बेपत्ता-
नेपाळ पर्यटन बोर्डाच्या प्राथमिक माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत जवळपास ४०० पर्यटक बेपत्ता झाल्याची शक्यता आहे. यामध्ये २९१ परदेशी पर्यटक आणि ९० हून अधिक स्थानिक नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यापैकी ३७ जण अनिवासी भारतीय (NRI) असल्याचेही समोर आले आहे.

मानसरोवर यात्रेकरूंची चिंता वाढली-
मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमार्गे प्रवास करणाऱ्या भारतीय यात्रेकरूंवरही पुराचे संकट ओढावले आहे. बेपत्ता असलेल्या भारतीयांमध्ये ३१ यात्रेकरूंचा समावेश असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून या यात्रेकरूंचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

१२ हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य-
पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नेपाळी सैन्याने मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू केली आहे. बचावकार्यासाठी एकूण १२ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये नेपाळी सैन्याची चार आणि खासगी क्षेत्रातील आठ हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

आतापर्यंत १२ जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये स्याफ्रुबेसी येथून सहा, मैलुंग येथून दोन आणि धुन्चे येथून चार जणांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या आणखी पाच जणांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बचाव पथके घटनास्थळी दाखल-
बचाव आणि मदतकार्याला सुरुवात करण्यासाठी नेपाळी सैन्याचे सुरुवातीला ३५ जवान तैनात करण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांचा आणि पर्यटकांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई पाहणी केली जात आहे.

पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या तीन जिल्ह्यांना नेपाळ सरकारने विशेष प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठकही घेण्यात आली असून, बचाव आणि मदतकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

भारतीय पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी शोधमोहीम-
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी संबंधित यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. बेपत्ता पर्यटकांची यादी तयार करण्यासोबतच त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पुराची परिस्थिती आणि बचावकार्यावर नेपाळ प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

महापुरामुळे नेपाळमध्ये पर्यटन आणि वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला असून, बचावकार्य पूर्ण होईपर्यंत परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.