Published On : Tue, Jan 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेच्या बाबतीत महात्मा गांधींच्या “नई तालीम” चा अवलंब करण्यात आला आहे : उपराष्ट्रपती

Advertisement

महात्मा गांधींनी मातृभाषेला स्वराज्याशी जोडले : उपराष्ट्रपती
भाषिक एकता मजबूत करण्यासाठी भारतीय भाषांमध्ये संवाद वाढवण्याची गरज – उपराष्ट्रपती
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले
उपराष्ट्र्पतींनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि अटलबिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे उद्‌घाटन केले

वर्धा: शालेय स्तरावर मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून महत्त्व देऊन नवीन शैक्षणिक धोरणात महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ चा अवलंब करण्यात आला आहे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला ते संबोधित करत होते. 1937 मध्ये महात्मा गांधींनी वर्धा येथे प्रस्ताव मांडलेल्या “नई तालीम” मध्ये विद्यार्थ्यांना मोफत अनिवार्य शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्याबरोबरच मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम बनवण्यावर भर दिला होता, याची उपराष्ट्रपतींनी यावेळी आठवण करून दिली.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नायडू म्हणाले की, आपल्या संविधान सभेने प्रदीर्घ चर्चेनंतर हिंदीचा अधिकृत भाषा म्हणून स्वीकार केला आणि आठव्या अनुसूचीमधील इतर भारतीय भाषांनाही घटनात्मक दर्जा दिला. प्रत्येक भारतीय भाषेचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध साहित्य असल्याचे सांगून ते म्हणाले, “आपल्या देशात भाषिक वैविध्य आहे हे आपले भाग्य आहे. आपल्या भाषा आपल्या सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असल्यामुळे आपले भाषिक वैविध्य ही आपली ताकद आहे”

भाषा संदर्भात महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यासाठी भाषेचा प्रश्न हा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न होता. हिंदीचा आग्रह धरूनही महात्मा गांधींनी प्रत्येक नागरिकाची मातृभाषेबद्दलची संवेदनशीलता समजून घेतल्याचे त्यांनी नमूद केले. गांधीजींनी मातृभाषेला स्वराज्याशी जोडले आणि तिला योग्य महत्त्व देण्याचे आवाहन केले, असे ते म्हणाले. अनिवासी भारतीय समुदायाला मातृभूमीशी जोडून ठेवण्यात भारतीय भाषांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही ते म्हणाले.

उपराष्ट्रपती म्हणाले की, सुसंस्कृत समाजाची भाषा सौम्य , सुसंस्कृत आणि सर्जनशील असणे अपेक्षित आहे. ते म्हणाले, ” भाषेची सभ्यता आणि शब्दांचा शिस्तबद्ध वापरासह आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आचरणात आणूया .”

यावेळी उपराष्ट्रपतींनी राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. डॉ.आंबेडकर आयुष्यभर शिक्षण आणि समतेसाठी कटिबद्ध राहिले, असे ते म्हणाले. डॉ.आंबेडकर यांचा पुतळा वर्धा विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपराष्ट्रपतींनी आज विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाचा भाग म्हणून अटल बिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे देखील उद्घाटन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या योगदानाचे स्मरण करताना ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र महासभेतले अटलजींचे हिंदीतील भाषण हा देशासाठी एक ऐतिहासिक क्षण होता.

अमर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे लोकार्पण करताना उपराष्ट्रपतींनी युवा पिढीला आपल्या वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाबाबत जागरूक करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी युवकांना जाती, धर्म, लिंग आणि प्रांत याच्या पलिकडे जाऊन देशाची एकता मजबूत करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

वर्धा विद्यापीठाच्या कामगिरीचे कौतुक करताना नायडू म्हणाले की, विद्यापीठाने हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यामुळे परदेशातल्या वाचकांना अस्सल हिंदी साहित्य उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

या संदर्भात, इतर भारतीय भाषांमधील साहित्यही त्याच्या हिंदी अनुवादासह ऑनलाइन उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपली भाषिक विविधता ही देशाची ताकद आहे, असे सांगून उपराष्ट्रपतींनी विविधतेतील एकतेचा हा धागा आणखी बळकट करण्याचे आवाहन केले आणि भारतीय भाषांमधील संवाद वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. विद्यापीठांच्या भाषा विभागांनी याबाबत महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी सूचना त्यांनी केली. “विद्यापीठांच्या भाषा विभागांमध्ये नियमित संपर्क आणि बौद्धिक सं

Advertisement
Advertisement