Published On : Thu, Dec 21st, 2017

जुन्या व नव्या इमारतींसाठी नवी ‘फायर अलर्ट सिस्टीम’ लावणे आता बंधनकारक – संजय बालपांडे

Advertisement

Fire Commititi Photo 21 Dec 2017 (2)
नागपूर: अग्निशमन विभागाकडे अस्तित्वात असलेली फायर अलर्ट हॉटलाईन सेक्युरिटी सिस्टीमसाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, ज्या इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा जास्त आहे अशा सर्व जुन्या व सर्व इमारतींना फायर अलर्ट सिस्टीम लावणे आता बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले.

गुरूवारी (ता.२१) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती प्रमोद चिखले, समिती सदस्य राजकुमार साहू, हरीश ग्वालबंशी, सदस्या ममता सहारे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

फायर सेफ्टी ॲक्टच्या आदेशानुसार ज्या इमारतींची उंची १५ मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त आहे आण ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम १५० चौ.मी. पेक्षा जास्त आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. नव्याने त्यात आलेल्या प्रणालीमध्ये फायर अलर्ट हॉटलाईन सेक्युरिटी सिस्टीम असणे आता गरजेचे आहे. या प्रणालीद्वारे त्या इमारतींची सर्व माहिती अग्निशमन विभागाकडे एका चीपद्वारे उपलब्ध असणार आहे. टाकीतील पाणी, अग्निशमन सेवा इत्यादींबाबत माहिती त्यात समाविष्ट राहणार असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अग्निशमन विभागामार्फत करण्यात येणारे विहीर सफाईचे कार्य आरोग्य विभागामार्फत करण्यात यावे, यावर चर्चा करण्यात आली. यावर बोलताना अग्निशमन विभागाला दररोज १७ व १८ विहिरी उपसा कराव्या लागतात. त्यामुळे त्याचा लाखो रूपयांचा भुर्दंड लागतो. यावर बोलताना सभापती बालपांडे म्हणाले की, सरकारी विहिरी या मोफत साफ करण्यात याव्यात. खासगी विहिरींकरिता नाममात्र शुल्क आकरण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

त्रिमूर्ती नगरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या अग्निशमन स्थानकाच्या इमारतीच्या बांधकामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. इमारतीचे बांधकाम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. यासोबतच वाठोडा, गंजीपेठ येथील स्थानक इमारतीचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

लकडगंज स्थानक इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने स्थानक बगडगंज येथील मनपाच्या शाळेत स्थलांतरित करण्याच्यादृष्टीने शाळेची किरकोळ दुरूस्ती करण्यासंदर्भातील आढावा सभापती बालपांडे यांनी घेतला. त्याबाबत बोलताना उचके म्हणाले की, शाळेची रीतसर परवानगी मिळाली आहे. शाळेमध्ये गाडी ठेवण्याकरिता शेड उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. पुढील आठ ते दहा दिवसात काम पूर्ण होईल अशी माहिती उचके यांनी दिली.

यानंतर शहरात बसविण्यात आलेल्या एल.ई.डी लाईट संदर्भात चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर माहिती कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिली.

बैठकीला विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, अग्निशमन विभागाचे सर्व स्थानक अधिकारी उपस्थित होते.

Advertisement