Published On : Fri, Jun 12th, 2020

नवीन कामठी पोलिसांनी दिले 7 गोवंश जनावरांना जीवनदान

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गाव मार्गे कामठी कडे गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करीत भरधाव वेगाने जात असलेल्या एका बोलेरो झेनॉन पीकअप वाहनावर गस्तीवर असलेल्या नवीन कामठी पोलिसांनी धाड घालून वाहन ताब्यात घेत कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जात असलेले 5 बैल व 2 गायी नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जात असलेल्या 7 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री 9 वाजता केली असून

या धाडीतुन जप्त वाहन क्र एम एच 20 इ जी 1183 किमती 5 लक्ष रुपये व 7 गोवंश जनावरे किमती 70 हजार रुपये असा एकूण 5 लक्ष 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी वाहनचालक सुलतान अहमद अब्दुल गणी वय 23 वर्षे रा शेख बुंनकर कॉलोनी कामठी विरुद्ध गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल , एसीपी मुंडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक पाल, सहाययक पोलीस निरीक्षक एस कर्नाके, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे, सुरेंद्र शेंडे,कमल कनोजिया, संदीप सगणे तसेच वाहनचालक अनिल बालराजे यांनी केले असुन पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement