अवघ्या तीन महिन्यात आरोपीस अटक
कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान नदीच्या तीरावरील हरदास घाट परिसरात एका 35 वर्षीय अनोळखी इसमाचा चेहरा छिन्न विच्छिन्न विद्रुप करून निर्घृण खून केल्याची घटना 5 जून 2020 ला सकाळी साडे दहा वाजता घडली असता सदर घटनेसंदर्भात पोलिसांना मृतकाची ओळख पटविणे तसेच आरोपीचा शोध लावणे हे एक आव्हानात्मक ठरले होते यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 302, 201 अंनव्ये गुन्हा नोंदवित नवीन कामठी पोलिसांनी तपासाला गती देत तर्कशक्तीच्या आधारावर सदर मृतकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यशप्राप्त होत सदर मृतक हा पिपरी कन्हान रहिवासी लक्ष्मण सुधाराम बावणे वय 30 वर्षे असल्याचे निष्पन्न झाले यावरून सीसीटीव्ही फुटेज वरून केलेल्या तपासणी वरून मृतकाच्या सोबत राहणारा व्यक्ती हा सुद्धा पिपरी कन्हान चा निष्पन्न झाले असून दोन्ही घरून बेपत्ता असल्याची माहिती झाली
यातील एकाचा खून झाला तर दुसऱ्याच्या शोधकामी तपासाला गती देत आरोपीला आज सायंकाळी 5 वाजता नागपूर येथील पावर ग्रीड चौक जरीपटका येथून अटक करण्यात आले असून अटक आरोपीचे नाव नानू कान्हेकर वय 35 वर्षे रा कन्हान पिपरी असे आहे .सदर अटक आरोपीने खुनाचा गुन्हा कबूल केला असून या खुनाचा अवघ्या तीन महिन्यात पर्दाफाश करीत आरोपीचा छडा लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले आहे.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , एसीपी मुंडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, गुन्हे पोलीस निरीक्षक आर आर पाल यांच्या नेतृत्वात तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस कँननाके,पप्पू यादव, मंगेश लांजेवार,मंगेश यादव, राजा टाकळीकर, सुरेंद्र शेंडे, सुधीर कनोजिया यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी