नवी दिल्ली :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारनंतर आज दिल्ली काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीअंतर्गत ईशान्य दिल्लीतून काँग्रेसने कन्हैया कुमार यांना संधी दिली असून, ते भाजपच उमेदवार मनोज तिवारी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
काँग्रेसने दिल्लीतील चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल, ईशान्य दिल्लीतून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम दिल्लीतून उदित राज, अमृतसरमधून गुरजित सिंह, जालंधरमधून चरणजित सिंह चन्नी, फतेहगढ साहिबमधून अमर सिंग, भंटिंडामधून जीत मोहिंदर सिंह सिद्धू, संगरूरमधून सुखपाल सिंह खैरा, पटियालामधून धरमवीर गांधी आणि अलाहाबादमधून उज्ज्वल रेवती रमण सिंह या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसने शनिवारीही उमेदवारांची यादी जाहीर केली होती. काँग्रेसने चंदीगडमधून मनीष तिवारी, गुजरातमधील मेहसाणामधून रामजी ठाकूर, अहमदाबाद पूर्वमधून हिम्मत सिंह पटेल, राजकोटमधून परेश भाई धनानी, नवसारीतून नैशध देसाई, हिमाचलमधील मंडीतून विक्रमादित्य सिंह, शिमलामधून विनोद सुलतानपुरी, ओदिशातील क्योंझारमधून मोहन हेबराम यांना उमेदवारी दिली आहे.
बालासोरमधून श्रीकांत कुमार जीना, भद्रकमधून आनंद प्रसाद सेठी, जजपूरमधून आंचल दास, ढेंकनालमधून सस्मिता बेहरा, जगतसिंगपूरमधून रवींद्र कुमार सेठी, पुरीमधून सुचरिता मोहंती, भुवनेश्वरमधून यासिर नवाज यांना संधी देण्यात आली आहे.